निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत. ...
राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे ...
मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला. ...
सरकारचे हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा सरकारने दुष्काळात टँकर सुरू करण्यासाठी आखडता हात घेतला आहे, असा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. ...