अकोला: सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये तापमान ४३ अंशांवर गेले असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
अकोला: खरीप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला असतानाच राज्यात, विदर्भात बोगस खते, कीटकनाशके आली असून, पश्चिम विदर्भात अशा बोगस निविष्ठाचा साठा मागच्या वर्षी आढळून आल्याने कृषी विभाग पुढच्या आठवड्यात या भागात धाडसत्र सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. ...
राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...
विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा क ...
स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत. ...
३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ ...