वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने चार ठिकाणी विजय मिळवला. आकडेवारीवरून आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीलाच झाला. तर अनेक मतदार संघात काँग्रेसला राष्ट्रवादीकडून हवी तशी मदत मिळाली नाही. ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीत विधानसभेच्या तोंडावर बेबनाव निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. ...
लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. ...