वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
खुद्द शरद पवारच इंदू मिल येथील स्मारकाच्या जागेची पाहणी करून स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. वंचितमुळे नाराज झालेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा इरादा असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या ला ...