वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Energy Minister Dr. Nitin Raut : नितीन राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगत थेट त्यांच्या उपचारासाठी अकोल्यातील मानसोपचारतज्ज्ञांकडे त्यांच्या नावाची नोंद केली ...