वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Prakash Ambedkar talk on Uddhav Thackeray alliance: प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. ...
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. ...