वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा पुणेकरांमध्ये होती. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मोरे यांनी अकोला इथं जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली ...
VBA Abhijeet Rathod Application Cancelled: वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. ...
VBA Attack on Nana Patole: नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पटोले यांनी केला होता. ...