वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
युतीच्या या बालेकिल्ल्यात गेल्या वेळी इम्तियाज जलील अगदी साडेचार-पाच हजार मतांनी निवडून आले होते. त्या निकालामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळची निवडणूकही तेवढीच घासून झाल्याचे दिसून आले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभेसाठी शिंदे व ठाकरे यांचा समझोता होऊन त्यांची नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मैदान येथील सभेत केला. तसेच राजन विचारे यांचे पाठींब् ...
2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. हा निकाल आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा वंचित बहुजन अघाडी इम्तियाज जलील यांच्या पाठीशी होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या मतांचाही त्य ...
loksabha Election 2024 - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा करत राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. ...