वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Pune Loksabha Election 2024: मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसच्या मोहन जोशी, रवींद्र धंगेकर यासारख्या नेत्यांची भेट घेतली होती. ...
Vasant More News: सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावल्यावर आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी करण्यासाठी वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Mahavikas Aghadi: प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडलवकर एक खरमरीत पोस्ट लिहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: एका दिवसांत उमेदवार तयार होत नाहीत. निवडणुकीची तयारी आधीपासून केली जाते. एक प्रकारे भाजपाला मदत असल्याची टीका ठाकरे गटाने वंचितने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर केली. ...