वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. ...
loksabha Election 2024: नागपूर इथं पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मविआतील अंतर्गत वादावर भाष्य करत विस्थापितांच्या राजकारणाला प्रस्थापितांचा विरोध होता असा आरोप केला. त्याचसोबत भाजपावरही आंबेडकरांनी निशाणा साधला. ...
Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले. ...