ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
राजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साता-याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. ...
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची ...
खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपी ...
सध्या साताऱ्यांत खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातून साधा विस्तव जात नसल्याचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुुकीत मी ठरवेन तोच आमदार होणार, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेतील उदयनराजे ...
आजपावेतो अनेक वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारी नेतेमंडळी जेव्हा हसतखेळत गप्पा मारू लागतात, शुभेच्छा देऊ लागतात... तेव्हा सर्वसामान्य जनतेला समजतं की कुछ तो गडबड है! ...
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. ...
सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्य ...
साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सात ...