Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Udayanraje bhosale, Latest Marathi News
उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे. ...
पुण्यात आयोजित सभेत डॉ. कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रासाठी भावनिक मुद्दा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज छत्रपती उदयनराजे यांना आव्हान द्याचे नव्हते म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे म्हटले. ...
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ...
सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे. ...
लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे. ...