महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामांची निकड, त्यांची तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीनुसार काम करण्यास सुरुवात केल्याने प्रभाग समित्यांमध्ये मंजूर झालेल्या विविध कामांचीही पुनर्पडताळणी होणार असून, त्यामधील अनावश्यक कामांना कात्री ...
नाशिक - महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणा-या सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरो ...
तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली होताच पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) त्यांनी घेतलेल्या निर्णयांना केराची टोपली दाखवली आहे ...