महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरां ...