महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता ...
अवाजवी करवाढीतून अखेर नाशिककर मुक्त झाले. मोकळ्या भूखंडांसह नवीन मिळकतींवरील करवाढ महासभेत सरसकटपणे नाकारली गेली, कारण एकदम मोठा घास घेण्याचा तो प्रयत्न होता. टप्प्या-टप्प्याने माफक करवाढीला भाजपाचाही विरोध नव्हता. परंतु प्रशासनाच्या हस्तक्षेपाने सत् ...
शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले. ...
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली. ...
‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले. ...