टेंभू, म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे क्षेत्र कमी करून पहिल्यांदाच सुमारे २५ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले आहे. ...
माण खटाव व सांगोला तालुक्याला कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाणी देण्यात आले असून आणखी १ टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी सांगितले. ...
दहिवडी : खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ...
टेंभू उपसा सिंचन योजना tembhu lift irrigation project २६ डिसेंबर २०२३ पासून तब्बल १६९ दिवस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे २४० गावांतील ६७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला लाभ मिळाला. ...
भविष्यात ज्या उपसा सिंचन योजना होतील, त्या बंद पाइपद्वारेच होतील. तसेच वाढीव पाणीपट्टीचा फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाचे अपर सचिव दीपक कपूर यांनी शिष्टमंडळाला दिले. ...
सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून ९०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून तीन हजार क्यूसेक्स सोडले जात आहे. ...