अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Cyclone Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे. ...
Tauktae Cyclone hits Bhiwandi : शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर वादळ वाऱ्याने शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. ...
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱया वादळी वाऱयांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांव ...