अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Three Covid Centres Audit And Aaditya Thackeray : तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...
Corona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे. ...
Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
Tauktae Cyclone In Mira Bhayandar : महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानक समोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. ...
Cyclone Tauktae: हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचा फटका याला बसला आहे. त्यामुळे येथील २२ रुग्णांना अखेर दुपार नंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरला हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. ...