Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:26 PM2021-05-17T21:26:50+5:302021-05-17T21:27:25+5:30

Corona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे.

Corona Vaccination: corvid preventive vaccination will be closed in Vasai Virar Municipal Corporation tomorrow! | Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

Next

-  आशिष राणे

वसई : 'तौक्ते 'चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने दि.18 मे रोजी वसई विरार मनपा हद्दीतील लाभार्थ्यांसाठी लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी उशिरा लोकमतला दिली.

अधिक माहितीनुसार, अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात जोरदार पाऊस व वादळी वारे सुरू आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई: तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. तसेच, या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चक्रीवादळामुळे एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. तर जवळपास १२ हजार ५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

Web Title: Corona Vaccination: corvid preventive vaccination will be closed in Vasai Virar Municipal Corporation tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app