वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० ...
निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठ ...
जिल्ह्यातील इतर नगर पालिकांसह लाखनी नगर पंचायतलासुद्धा शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष ...
मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अ ...
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यं ...