तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे. ...
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...
मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...
गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...