सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. ...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना वनविभागातर्फे देण्यात येणारी ८ लाख रुपयांची मदत वाढवून आता १० लाख रुपये करण्यात आली आहे, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...
व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करतात. यामध्ये अनेकदा जनावरांचा मृत्यू होतो. अशावेळी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात येईल. ...
‘यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष’ अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील बोटेझरी शिवारात रोपवाटिका तयार केली. ...
ई वे बिल ची मर्यादा ५० हजारांवरून एक लाखापर्यंत वाढवल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केली. तसेच वस्त्रोद्योगातील विविध प्रकल्प उद्योगांना ई वे बिलाच्या प्रक्रियेतून वगळल्याची घोषणाही त्यांनी केली. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल ...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. ...