जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली. ...
शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ...
सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ...
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. ...
‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सीझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. ...