कमी झालेले जंगल, झुडुप आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची वाढलेली व्याप्ती, यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्ती त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. ...
स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे. ...
भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. ...
सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली. ...