Two-year-old boy dies of snake bite in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात सर्पदंशाने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात सर्पदंशाने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्याच्या गवराळा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
राघव सतीश मेंढे (२) असे मृत बालकाचे नाव आहे. राघव शुक्रवारी घरापुढील अंगणात खेळत होता. खेळण्यात मग्न असताना अचानक एका विषारी सापाने दंश केला. मात्र कुणाला कळले नाही. काही वेळाने तो अस्वस्थ झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. बघितले तर त्याच्या उजव्या पायाला कशाचा तरी दंश झाल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता मुलगा मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


Web Title: Two-year-old boy dies of snake bite in Bhandara district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.