स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. ...
अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काय गुन्हा नव्हे, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इरणींचे समर्थन केले. ...