नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला. ...
तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. ...
‘दंडवतेजी, आपकी कला बहुत सुंदर और रचनात्मक है।’ असे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांची गळाभेट घेतली. ...
सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे. ...
गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले. ...
नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे. ...
नगर-दौंड रोडवर वाळूची ट्रक व मारुती यांच्यात जोरदार धडक होऊन मारुती व्हॅनचा चालक देवीदास बापूराव बनकर (रा. माळवाडी अजनुज, वय ६५) हे जागीच ठार झाले. हा अपघात मातोश्री हॉस्पीटलसमोर गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. ...