Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जाप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. ...
श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. १) काशी विश्वनाथविश्वनाथ ज्योति ...
वेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच आगमन केले आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच सण असलेल्या नागपंचमीला मुंबईसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी ...