छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. याचनिमित्त निर्माता रवी जाधवने बालशिवाजी सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...
देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात ...
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...
गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे ...
शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला ...