महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. ...
सातारा येथील वाढे फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने युवक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकरा वाजता झाला. ...
फलटण तालुक्यातील सांगवी येथील दादा रकमाजी सोनटक्के (वय ८५) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला. ...
मुंबईहून साताऱ्यात नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा बसस्थानकात घडली. ...
मंदिरात पेटत्या समईला साडी लागल्याने भाजून जखमी झालेल्या काशीबाई मनोहर पुजारी (वय ७५, रा. रविवार पेठ, फलटण) या वृद्ध पुजारी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...