गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती. ...
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते. ...
सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या. ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ठाणे, धुळे, वर्धा, मुंबई महानगरपालिका, पीएम केअर, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू, टाटा ट्रस्ट आदि विविध ठिकाणी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. ...
सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. ...
मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्द ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारी ७६३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ३३७ नवे रुग्ण आढळले असून रविवारी दिवसभरात ३६३ ...