सांगली जिल्हा बँक निवडणूक : मतदारांनो बिनधास्त करा मतदान, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 03:18 PM2021-11-20T15:18:35+5:302021-11-20T15:25:12+5:30

जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे.

Sangli District Bank Election | सांगली जिल्हा बँक निवडणूक : मतदारांनो बिनधास्त करा मतदान, कारण..

सांगली जिल्हा बँक निवडणूक : मतदारांनो बिनधास्त करा मतदान, कारण..

googlenewsNext

सांगली : जिल्हा बँक निवडणुकीत मतदारानी कोणत्याही अमिषाला दबावाला बळी न पडता निर्भय पणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनियता पाळली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले.

जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे. या गटातील उमेदवारांने प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले याची माहिती मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.  पतसंस्था, प्रक्रिया, औद्यागिक, गृहनिर्माण, मजुर, बॅँका आदी. सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादीत संख्या आहे. यामुळे संस्थातील मतदारांवर दबाव टाकला जात आहे.

याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी निळंकठ करे म्हणाले, गट अ मध्ये त्या त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहे. मात्र महीला राखीव, अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत. मतमोजणी वेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार असून नंतर ते टेबल निहाय मोजले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतपत्रीका एकत्र होणार असल्याचे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदरांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे.

मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे

मतदान केंद्रात मतदारांची मतदान करताना पुर्ण पणे गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराकडून गोपनियतेचा भंग करत मतपत्रीका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार झाल्यास ती मतपत्रीका केंद्राध्यक्षांकडे जमा करण्यात येणार आहे. अशी मतपत्रीका मतदान पेटीत टाकली जाणार नाही. हे मत बाद करण्यात येणार आहे. गोपनियमात भंग होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

Web Title: Sangli District Bank Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.