सांगली : येथील हनुमान नगरमधील तिसऱ्या गल्लीत गुंड गणेश बसाप्पा माळगे (वय २७, रा. स्वामी समर्थ मंदिरजवळ, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली ) याचा धारदार शस्त्राने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. ...
पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे. ...
केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. ...
केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून ...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केल्यानंतर भाजपने महापालिकेत पदाधिकारी निवडताना सोशल इंजिनिअरिंंगवर भर दिला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेत जातीय समीकरणेही जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. ...
एकाच कुटुंबातील कर्जदार असलेल्या सर्व सदस्यांना कर्जमाफी देण्याच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यात अडिच हजारावर शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. अद्याप लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे. ...