सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ...
सदर शस्त्रक्रिया ही किचकट व खर्चिक असल्याने मुंबई येथील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. डांगे कुटुंबियांनी याचवेळी मदतीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता ...
"आता कसं वाटतंय आजी .... काही काळजी करू नका... दोन - तीन दिवसात बर्या व्हाल..." अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला धीर दिला. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 33.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यानंतर, आता विश्वजीत कदम यांनाही कोरोना झाला आहे. ...
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना झाला आहे. ताप व अंगदुखी असल्याने काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याना पुणे येथील घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. ...