ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:10 PM2020-09-13T15:10:00+5:302020-09-13T15:10:47+5:30

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने ...

Veteran painter Shafi Nayakwadi passes away | ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधनमहाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सांगलीत २0१२ मध्ये पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. महाविद्यालयीन जीवनापासून ते नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. एकांकिका आणि नाटकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

विविध नाटकांमध्ये दर्जेदार अभिनय करून त्यांनी या क्षेत्रावर छाप पाडली. नाट्यपंढरी सांगलीतील विविध संस्थांशी ते जोडले गेले. सांगलीतील अबकड कल्चरल ग्रुपचे ते संस्थापक संचालक होते.

नाट्यचळवळ वाढावी म्हणून त्यांनी नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेची स्थापना केली. त्याचे ते अध्यक्ष होते. शाखेच्या माध्यमातून त्यांनी बालनाट्य शिबिर, सुगम संगीत, भावगीत स्पर्धांचे आयोजन केले. नाट्य प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून नवे कलाकार त्यांनी तयार केले.

राज्यभरातील विविध नाट्यस्पर्धांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम केले. गेल्या काही वर्षात अनेक नाटकांचे यशस्वी दिग्दर्शनही त्यांनी केले. राज्यभरातील दिग्गज रंगकर्मी, ंिचत्रपट अभिनेत्यांशी त्यांचे जिव्हाळ््याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने नाटयक्षेत्राला धक्का बसला.

रंगकर्मी, अभिनेते व तंत्रज्ञ यांच्यामार्फत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सांगलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Veteran painter Shafi Nayakwadi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.