१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळ ...
Sachin Vaze Case: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Antilia Case) यांच्या अंटीलियाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीसांचे अधिकारी सचिन वाझे यांचे आयुष्यच एक रहस्यमची ठरण्याची शक्यता आहे. 2003 मधील निलंबनानंतर वाझेंनी अनुभव पणाला ...
Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...
मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Sachin Vaze, Home Minister Anil Deshmukh Reply to Devendra Fadnavis Allegations: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता, आता यावरून गृहमंत्री अनिल ...
Mukesh Ambani Antilia Bomb Scare: एनआयएला या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याची पटकथा लिहिली गेल्याचे मानले जात आहे. ...