१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
LMOTY 2020 : महाराष्ट्र एटीएस देखील चांगला तपास करत आहेत, ते सुद्धा दोषी हुडकून काढतील, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' या सोहळ्यात दिली. ...
Anil Deshmukh talk on Parambir Singh transfer: स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली ...
Home Minister Anil Deshmukh: या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. ...
Home Minister Anil Deshmukh on Sachin Vaze Case: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले ...
Congress MP Kumar Ketkar raised issue of Mukesh Ambani Bomb Scare in Rajyasabha: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. ...