LMOTY 2020 : "सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:18 PM2021-03-18T16:18:49+5:302021-03-18T16:20:08+5:30

LMOTY 2020 : महाराष्ट्र एटीएस देखील चांगला तपास करत आहेत, ते सुद्धा दोषी हुडकून काढतील, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' या सोहळ्यात दिली. 

LMOTY 2020 : "No reply from CBI in 8 months in Sushant Singh Rajput case" | LMOTY 2020 : "सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही"

LMOTY 2020 : "सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही"

Next
ठळक मुद्दे सीबीआयसारखी संस्था सुद्धा आठ महिने झाले तरी रिपोर्ट देऊ शकत नाही. आत्महत्या झाली की हत्या झाली. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात.

सचिन वाझे प्रकरणाआधी महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडल्या. सुशांत सिंग राजपूतचा पोलीस मुंबई पोलीस अतिशय चांगल्या पद्दतीने करत होते, एकाएकी हा तपास केंद्र सरकारने सीबीआयला दिला. आठ महिने झाले सीबीआयच्या तपासाला, आता आम्ही सीबीआयला विचारले तुमच्याकडे तपास दिला, पुढे शेवटी काय झाले. पण अदयाप काही उत्तर नाही. केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत मला काही टिपण्णी करायची नाही. पण सीबीआयसारखी संस्था सुद्धा आठ महिने झाले तरी रिपोर्ट देऊ शकत नाही. आत्महत्या झाली की हत्या झाली. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. पण ज्या काही राष्ट्रीय स्तरावर एजन्सी आहेत. त्यांना काही ठिकाणी यश मिळत, कुठे नाही मिळत. आता जी मुंबईपोलिसांमध्ये घटना घडली आहे. त्यामध्ये जो दोषी आहे ते शोधून काढतील. महाराष्ट्र एटीएस देखील चांगला तपास करत आहेत, ते सुद्धा दोषी हुडकून काढतील, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' या सोहळ्यात दिली. 

 

LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

 

 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली  प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं, परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे. 

LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात...

 

अनिल देशमुख यांनी मंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीचे कारण सांगितले आहे. पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना मोहरा बनविल्याचे आरोप विरोधक करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच खुलासा केला आहे. सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त यांची बदली ही प्रशासकीय बदली नाही. ती कारवाई आहे. चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या. अक्षम्य अशा त्या गोष्टी आहेत. त्या समजल्याने या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. 

Read in English

Web Title: LMOTY 2020 : "No reply from CBI in 8 months in Sushant Singh Rajput case"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.