१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sachin Vaze : मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. ...
Thackeray government: महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन आता अडीच वर्षे होतील. या अडीच वर्षाचं वर्णन खोटेपणा , फसवणूक याबरोबरच हुकूमशाही आणि क्रूरतेची अडीच वर्षे असच करावं लागेल. या सरकारने मतदारांची केलेली फसवणूक हा खरं तर प्रबंधाचा विषय होऊ शकतो. प ...
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे दोघेही शिवसेनेमध्ये होते. सामान्य पोलिसांकडे ४५ लाख आले कुठून, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे. ...
Anil Deshmukh And Sachin Vaze : याद्वारे, सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या (आयओ) कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती ...
अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सूत्रधार होते, असे विधान मलिक यांनी केले होते. ...