ठाणे :आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली. ...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. ...
उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. ...
उपप्रादेशिक परिवहन मधील रखडलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अखेर पूर्ण झाले असून या ट्रॅकवर मंगळवारपासून वाहनांच्या ब्रेक तपासणीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...
आरटीओ कार्यालयाने रिक्षा, टॅक्सीमध्ये ‘क्युआर कोड’ पद्धतीनुसार स्टिकर लावण्याची तयारी केली आहे. या स्टिकरद्वारे परवानाधारक, चालक, हेल्पलाइनची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ...
नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. ...