ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे. ...
जुने बसस्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अगदी प्रवेशद्वारावर एका तरुण व्यापाऱ्यास गंभीर जखमी करीत चार जणांनी बॅगमधील रोकड जबरीने हिसकावून पोबारा केला. ...