नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
डिझेल दरवाढ, टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने गत पाच दिवसांपासून बंद पुकारला आहे़ या आंदोलनात देशातील एक हजार पाचशे मालवाहतूक संघटनांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक ट्रकमालक सहभागी झाले आहेत़ ...
वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच् ...
६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ...
अकोला: शुक्रवारपासून सुरू झालेले वाहतूकदारांचे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे शनिवारी अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले. ...
डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आड ...