तालुक्यातील वझर, येसेगाव, चांदज या भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळूचा अवैध उपसा होत असून वाळू माफियांनी खबऱ्याचे जाळे पसरविल्याने वाळू माफिया मोकाट सुटत आहेत. एकीकडे घरकुल बांधकामाकरीता वाळू मिळत नसताना दुसरीकडे सोन्याच्या भावात वाळू विक्री होत आहे. ...
शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. ...
नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. ...
जिल्हाभरात बेकायदा वाळूचा धंदा तेजीत सुरु असून, महसूल विभागाने १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १६१ वाळू माफियांवर कारवाई करत ८ कोटी २८ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. ...
जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वी वित्त विभागाची मान्यता न घेतल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून प्रशासनही हतबल झाले आहे. ...
हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे. ...