Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.