Nagpur News गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगातच पेरणी करून घेतली. परंतु, गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पिके सुकण्याच्या अवस्थेला पोहोचली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मृगात अल्पसा ...
साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुव ...
रोवणीसाठी पऱ्हे खोदणीच्या कामालाही गुरूवारी अनेकांनी सुरूवात केल्याचे चित्र दिसून आले. गुरूवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २३.३ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक १२० मिमी पाऊस देसाईगंज तालुक्यात झाला आहे. याशिवाय गडचिरोली तालु ...
हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र जून महिन्यापासूनच पावसाने दगा देण्यास सुरुवात केली. पावसाची दोन मोठी नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात ...
जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर ...