राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India vs England 5th Test: आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पहिल्यांदा मैदानात उतरणार होता. त्यावेळी त्यालाही दडपण आलं, त्याने डोळ्यापुढे आलेल्या आदर्श व्यक्तीशी संवाद साधला आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. ...
India vs England 5th Test: भारतीय संघाने पुन्हा एकदा कसोटी सामन्यावर पकड घेण्याची संधी गमावली. पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी ७ फलंदाज १९८ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडने ३३२ धावांचा डोंगर उभा केला. ...
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...
India vs England Test: विराट कोहलीने ट्रेंट ब्रिज कसोटीत दर्जेदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्धच्या या मालिकेत भारताने आव्हान कायम राखले आहे. ...
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या क्रिकेपटूंवरही सिनेमा आला होता. आता माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर सिनेमा येऊ शकतो, असे बोलले जात आहे. याबाबत काही प्रश्न दस्तुरखुद्द द्रविडलाच विचारले गेले. आपली भूमिका कोणत्या अभिनेत्याने केली, हे द्रविडने यावेळी ...