IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर

IND vs PAK: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एक वेगळा विक्रम नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:42 PM2018-09-24T12:42:45+5:302018-09-24T12:45:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK: MS Dhoni overtakes Rahul Dravid to become the second most capped Indian | IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर

IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेआशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एक वेगळा विक्रम नावावर केला. फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण यापैकी कोणत्याही आघाडीवर धोनीने हा विक्रम केलेला नाही. पण, तरिही त्याने माजी कसोटीपटू राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना हा धोनीचा एकूण 505 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात खेळून त्याने द्रविडच्या 504 सामन्यांचा विक्रम मोडला.



भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी दुसऱ्या स्थानी आहे, तर महान फलंदाज सचिन तेंडुलकर 664 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. तेंडुलकरचा सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीला मोडणे शक्य नाही. धोनीने भारताकडून 90 कसोटी, 325 वन डे आणि 93 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा ट्वेंटी-20 विश्वचषक आणि 2011चा वन डे विश्वचषक जिंकला आहे. 


 

Web Title: IND vs PAK: MS Dhoni overtakes Rahul Dravid to become the second most capped Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.