राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत असून त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे. ...
Rahul Dravid News: Indian Cricket Teamच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय संघाची एकेकाळची द वॉल असलेल्या Rahul Dravidने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला आहे. ...