IND vs NZ, 1st T20I : तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे संघ?; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांनी कार्यभार सांभाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:11 PM2021-11-16T17:11:41+5:302021-11-16T17:12:19+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st T20I : We aren't looking at separate teams for different formats but player's mental health is important: Rahul Dravid are addressing a press conference  | IND vs NZ, 1st T20I : तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे संघ?; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

IND vs NZ, 1st T20I : तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे संघ?; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st T20I, Rahul Dravid on His Vision: Keep getting better as players and individuals : भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी कार्यभार सांभाळला. १७ नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी राहुल द्रविड व रोहित यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुलनं खेळाडूंच्या मानसिक तंदुरुस्तीवर भर देताना, त्याची भूमिका स्पष्ट केली.

तो म्हणाला,''आतापर्यंत फार मोजक्याच खेळाडूंशी संवाद साधला. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडूंना डिस्टर्ब करायचं नव्हतं. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशी बोलणं झालं होतं. ही सुरुवात आहे, त्यामुळे सध्यातरी निरीक्षण करण्याचं काम करेन. आम्ही विषेश एका गोष्टीवरच काम करणार असे नाही, सर्व  बाजू महत्त्वाच्या आहेत. त्यात दिवसेंदिवस सुधारणा करणे आणि खेळाडू व व्यक्ती म्हणून वाढणे याला प्राधान्य आहे. ''

''न्यूझीलंड हा खूप चांगला संघ आहे आणि चुका न करणे हेच आपल्या हातात आहे. आता त्यांना underdogs म्हणणे चुकीचे ठरेल, आत समीकरण बदललं आहे. त्यांनी मोठ्या संघांना पराभूत केलं आहे, त्यामुळे आता आमचा खेळ अधिक उंचावण्याची संधी आहे. बायो बबलमुळे खेळाडूंसाठी हा आव्हानात्मक काळ आहे. विशेषकरून जे तिन्ही फॉरमॅट खेळत आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्व सामने खेळू शकत नाही, हे सत्य स्वीकारायला हवं. पण, आम्ही त्यासाठी प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा संघ निवडणार नाही, परंतु खेळाडूंचं मानसिक आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,'' हेही द्रविडनं स्पष्ट केलं. खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यावर भर असल्याचे द्रविड म्हणाला.

रोहित शर्माबाबत काय म्हणाला द्रविड?
रोहित शर्माकडे विशेष टॅलेंज आहे. २००७मध्ये जेव्हा तो संघात दाखल झाला, तेव्हापासून सर्वांना हे माहीत होतं. पण, एवढ्या वर्षानंतर या भूमिकेत त्याच्यासोबत काम करायला मिळेल, असा विचारही केला नव्हता. भारतीय आणि मुंबईकर क्रिकेटपटू म्हणून लेगसी कायम राखणे सोपी गष्ट नाही.   

Web Title: IND vs NZ, 1st T20I : We aren't looking at separate teams for different formats but player's mental health is important: Rahul Dravid are addressing a press conference 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.