राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India vs South Africa T20I Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका गुरूवारपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ...
राहुल द्रविड लवकरच एका राजकीय व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा आहे. १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे भाजपायमोची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
युवीने पुढील कसोटीत शतक झलकावले आणि तीन कसोटींच्या मालिकेत त्याने 57.50च्या सरासरीने 200+ धावा केल्या होत्या. पण, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले नाही. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 शतकं आहेत. ...